Maharashtra Politics: महाविकास आघाडीची आजची शेवटची वज्रमूठ सभा! शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा दावा

Sanjay Shirsat News: आज झालेल्या सभेत नागरिकांना आणि स्टेजवर असलेल्या लोकांना बोर झालं होत असे म्हणत संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर टीका केलीय.
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadisaam tv

>> नवनीत तापडिया

Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi : आज मुंबईत झालेली महाविकास आघाडीची सभा ही शेवटची हो, यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार नाही, असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलय. आज झालेल्या सभेत नागरिकांना आणि स्टेजवर असलेल्या लोकांना बोर झालं होत असे म्हणत संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर टीका केलीय.

संजय शिसराट म्हणाले, या सभेत कुठलाही दम नव्हता, इतर नेत्यांच्या भाषणामध्ये देखील काही दम दिसला नाही, त्यांनी पुढच्या सभेची घोषणा केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही शेवटची होती. यानंतर सभा होणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Uddhav Thackeray Speech: टीनपाटांवर बूच घाला, अन्यथा...'; उद्धव ठाकरेंची वज्रमूठ सभेत नाव न घेता राणे कुटुंबीयांवर टीकास्त्र

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार - आदित्य ठाकरे

मुंबईतील बीकेसीत मैदानात आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख नेते उपस्थित होति. यावेळी सर्वच नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिंदे-फडणवीस यांचे सरकार हे कोसळणार म्हणजे कोसळणारच असा दावा देखील त्यांनी केला. (Maharashtra Politics)

गद्दारी करून आलेलं सरकार - अजित पवार

ते म्हणाले, 'हे लोकांच्या मनातलं सरकार नाहीये. हे दगाफटका देऊन निर्माण झालेलं सरकार आहे, गद्दारी करून आलेलं सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने अशी गद्दारी कधी सहन केलेली नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसा नाहीये. महापुरुषांचे आदर्श आपल्या समोर आहेत. परंतु आज या महापुरुषांच्या महाराष्ट्रात अतिशय चुकिचा कारभार चाललेला आपण पाहत आहोत असे अजित पवार म्हणाले. (Latest Political News)

Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Ajit Pawar Speech BKC: हे दगाफटका, गद्दारी करून आलेलं सरकार! अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचा इशारा

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' कर्नाटन निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मला ९१ वेळा शिव्या दिल्या. मी शिव्या देण्याचे समर्थन करत नाही. मी तुमची टीनपाटे मला, आदित्य, कुटुंबाला शिव्या देतात, त्यांना का बोलत नाही. संजय राऊतही त्या भाषेत बोलत नाही. आम्ही मान ठेवतो. टीनपाटांवर बूच घाला, तुमची लोक वाटेल ते बोलणार, मग आमची लोक पण बोलणार. रोज काहीही बोलणार आम्ही ऐकून घेणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com