Mahavikas Aghadi Vajramuth Sabha BKC Mumbai : मुंबईत बिकेसी मैदानावर आज महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे लोकांच्या मनातील सरकार नसून गद्दारी करून आलेलं सरकार आहे असे टीका यावेळी अजित पवार यांनी केली.
ते म्हणाले, 'हे लोकांच्या मनातलं सरकार नाहीये. हे दगाफटका देऊन निर्माण झालेलं सरकार आहे, गद्दारी करून आलेलं सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने अशी गद्दारी कधी सहन केलेली नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसा नाहीये. महापुरुषांचे आदर्श आपल्या समोर आहेत. परंतु आज या महापुरुषांच्या महाराष्ट्रात अतिशय चुकिचा कारभार चाललेला आपण पाहत आहोत असे अजित पवार म्हणाले.
'आम्ही उत्तमरित्या सरकार चालवलं'
आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. अनेक अडचणी होत्या, कोरोनाचं संकट होतं, पण त्यावर मात करून आम्ही उत्तमरित्या सरकार चालवलं. आर्थिक शिस्त आम्ही कधीही मोडली नाही. ३१ मार्चची १ लाख ८ हजार कोटींची बिलं या सरकारने द्यायची थांबवली आहे हे माझ्या वाचण्यात आलं. याला कोण जबाबदार आहे असा सवाल अजित पवार यांनी विचराला.
सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही - अजित पवार
अजित पवार म्हणाले शेतकरी अडचणीत आहे. फळबागा, पिकं उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. शिंदे फडणवीस काय करतात? त्यांना काळजी नाही का? त्यांना दुसऱ्याच कामत जास्त रस आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला.
'सरकार निवडणुका घ्यायला घाबरतंय'
पुढे बोलताना ते म्हणाले, १० महिने झाले सरकार निवडणुका घ्यायला का घाबरतंय? महानगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेत नाहीत. यांच्या मनात भीती आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता काय करेल याचा विश्वास शिंदे-फडणवीस सरकारला नाहीये, अशी टीका देखील अजित पवार यांनी केली आहे.
शिवसेनेमुळे मुंबई टिकली
मुंबई शिवसेनेची असली तरी सहजासहजी आपल्याला मिळालेली नाही. अनेक लोकांनी त्यासाठी बलिदान दिले. त्यातूनच आपन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश मिळावला. मुंबईचं मराठीपण टिवण्यामध्ये आणि मुंबईचा मानसन्मान राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट यांनी केले आहे. शिवसेनेमुळे मुंबई टिकली, मुंबईत मराठी मानसाचा अभिमान आणि स्वाभिमान कायम राहिला, मराठी माणूस एकजुट करून राहिला, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही, असे अजित पवार म्हणाले. (Latest Political News)
'जनता आपल्यासोबत आहे'
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, हेच नेमकं काहींचे डोळ्यावर यायला लागलं. काही लोकांना फोडण्याचं राजकारण झालं. अशाप्रकारच्या राजकारणामुळे कायदा आणि घटना काय राहिल याचा विचार सर्वांनी करण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले. हे सरकार आल्यापासून पोटनिवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे, जनता आपल्यासोबत आहे, असे अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.