Aditya Thackeray on Eknath Shinde : ''आज या घटनाबाह्य सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटतात का? योगायोग असा आहे, आज गुजरातकडे दोन मुख्यमंत्री आहेत. एक त्यांचे दुसरे आपले'', असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत बीकेसी येथे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते असं म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''केंद्र सरकारकडे मी एक मागणी केली, गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य एकाच दिवशी गठीत झालेत. १ मे त्यांचा आणि आपलाही स्थापाना दिवस. जितक्या मी महाराष्ट्राला शुभेच्छा देत आहे, तितक्याच मी गुजरातलाही देत आहे. मात्र इथं कोणी ज्योतिषी असल्यास सांगावं, दोन्ही राज्याच्या कुंडलीत काय फरक आहे?'' केंद्र सरकारकडून गुजरातला पाठबळ मिळत आहे. मात्र तितकंच महाराष्ट्राला मिळत आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)
आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''राज्याच्या मंत्रिमंडळात घटाबाह्य सरकार बसलं आहे, आणि मी लिहून देतो की हे थोड्या दिवसाचा खेळ आहे, सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच.''
ते म्हणाले, ''या सरकारमध्ये एकतरी महिली, मुंबईचा अस्सल मुंबईकर दिसला आहे का? कदाचित कोणीतरी स्केअर फूट विकणारे असतील पण इंच इंच जाणणारे कोणी नाहीयेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. ना मुंबईचा, ना पुण्याचा आवाज आहे. मंत्रीमंडळ पाहिलं तर हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार झालं आहे''
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ''महाविकास आघाडीच्या काळातजी कर्जमुक्ती झाली, कोविडच्या काळात अर्थचक्र बंद असताना देखील अनेक अपत्ती आल्या पण त्यावेळी साडे १४ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली. मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली पण शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार कोणी या मंत्रिमंडळात नाहीये.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.