Rajkot Fort Saam Tv
महाराष्ट्र

Rajkot Fort: राजकोट किल्ला आजपासून बंद, पर्यटकांमध्ये नाराजी; नेमकं कारण काय?

Malvan Rajkot Fort: राजकोट किल्ला पर्यटकांसाठी आजपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा किल्ला बंद करण्यात आल्यामुळे माजी आमदार वैभव नाईक संतापले आहेत.

Priya More

सिंधुदुर्गतील मालवण राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकतीच चौथर्‍याच्या बाजूची जमीन खचली होती. चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत रविवार २२ जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. 'मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का?', असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

तसंच, 'शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्षे टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.' अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावे लागत आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट, जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT