Mla Rajesh Tope News : राष्ट्रवादी पक्ष (ncp) हा एकसंघ आहे, त्याबाबत कुठलीही शंका नसल्याची प्रतिक्रिया माजी आरोग्य मंत्री राजेश टाेपे (rajesh tope) यांनी विराेधी पक्षनेते अजित पवार हे भाजपाच्या (Ajit Pawar May Join BJP) वाटेवर असल्याच्या चर्चेवरुन दिली. आमदार टाेपे हे जालना येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)
राष्ट्रवादीचे आमदार माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले जालना जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटीच्या निवडणुका असल्याने सर्व कार्यकर्त्यांसह जालन्यात बैठका घेत आहे. राष्ट्रवादीत पक्षश्रेष्ठी, पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दादा हेच सर्व गाेष्टी ठरवतात. त्याचप्रमाणे पक्षाचे काम चालत असतं आणि त्याच प्रमाणे आम्ही काम करत असतो.
त्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष एकसंघ आहे. त्याबाबत कुठलीही शंका नसल्याची प्रतिक्रिया माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तुम्ही जाणार का ? असं विचारलं असता टाेपे यांनी अधिक बोलण टाळले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.