- विनायक वंजारे
Vinayak Raut News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (cm eknath shinde faction) आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून काेकणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील (uddhav thackeray faction) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात शिंदे गटास यश देखील मिळू लागले आहे. यावर खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी राजकीय दबावाखाली शासकीय कर्मचारी काम करीत असल्याचा गंभीर आराेप केला आहे. (Maharashtra News)
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. देवगड नगरपंचायतीत उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई होऊन सत्ता महाविकास आघाडीकडून भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर बोलताना राऊत म्हणाले लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे. राजकीय दबावापोटी काम करणे खपवून घेतलं जाणार नाही असे त्यांना सांगणार असल्याचे ही विनायक राऊत यांनी नमूद केले.
खासदार विनायक राऊत म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे विद्वान आणि अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल असे विधान केल आहे. केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे अधिकारी 11 तास त्यांची चौकशी करतात, त्यांचा मानसिक छळ करतात हे दुर्दैव आहे.
महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांना सातत्याने ईडीचा त्रास देऊन येन केन प्रकारे आमच्या मध्ये या आणि ईडी पासून मुक्त व्हा असं सांगितलं जातंय. ईडीचा वापर करून आपल्या पक्षाचा भरणा करण्याचं काम केंद्रीय नेतृत्व करतेय. दुर्दैवाने नाईलाज म्हणून त्याला काही नेते बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे विनायक राऊत यांनी नमूद केले. एक प्रकारे आंबेडकर यांच्या वक्तव्याला राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.