नाट्यमय घडामोडीनंतर राजेश काटकर यांच्याकडे परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार! राजेश काटकर
महाराष्ट्र

नाट्यमय घडामोडीनंतर राजेश काटकर यांच्याकडे परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार!

शिस्तप्रिय अधिकारी असल्याने आंचल गोयल यांची नियुक्ती होऊन ती रद्द करण्यात आली असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.

राजेश काटकर

परभणी : परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर आज निवृत्त झाले. मुगळीकर यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात आली होती . मात्र आज एका नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांच्या निवृत्तीच्या वेळी अचानक अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवला गेला.

हे देखील पहा -

जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी आंचल गोयल या परभणी जिल्ह्यात दोन दिवस आधीच दाखल झाल्या होत्या. मात्र, आज पालकमंत्री नवाब मलिक यांच्या कुठल्याही कार्यक्रमात अंचल गोयल या उपस्थित नव्हत्या आणि त्यामुळेच आंचल यांच्या बदलीच्या हालचाली पडद्यामागे सुरू असल्याचे बोलले जात आहे.

अखेर संध्याकाळी आंचल गोयल यांना राज्य सरकारने तातडीने परत मुंबईला बोलावले असल्याची माहिती समोर आली आणि जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपविला. आंचल गोयल या डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या अशी चर्चा जिल्हाभरात रंगत होती. त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या दबावापोटी अखेर सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आज मुंगळीकरांच्या निवृत्तीनंतर उद्यापासून अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर हे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मात्र, आंचल गोयल यांच्या जागी आता परभणी जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार याची उत्सुकता परभणीकरांना लागली आहे. दरम्यान, कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी असल्याने आंचल गोयल यांची नियुक्ती होऊन ती रद्द करण्यात आली असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

Maharashtra Live News Update : माधुरी मिसाळ यांनी घेतली स्व.शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

SCROLL FOR NEXT