Raj-Uddhav Thackeray Video Saam Tv
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषणानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Raj-Uddhav Thackeray Together First Video: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज २० वर्षांनी एका मंचावर आले आहेत. या दोघांना एकत्र पाहण्याची लाखो कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाली आहे.

Siddhi Hande

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर एकत्र आले आहे. मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. जवळपास २० वर्षांनी हे दोघेही एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी मराठी माणसाची इच्छा होती. तो ऐतिहासिक क्षण आज कार्यकर्त्यांना अनुभवता आला आहे. या दोघांनी एकत्र मंचावर एन्ट्री घेतली. याचा पहिला व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सर्वात आधी राज ठाकरेंनी भाषण केली. राज ठाकरेंनी मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भाषनानंतर दोन्ही ठाकरे बंधू बाजूबाजूला बसले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली आणि खळखळून हसले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)

राज ठाकरे- उद्धव ठाकरे २० वर्षांनी एकत्र (Raj-Uddhav Thackeray Together After 20 Years)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. या विजयी मेळाव्यानिमित्त हे दोघेही एकत्र आले आहे. दोघांनी मंचावर एकत्र एन्ट्री घेतली आहे. या क्षणाची लाखो लोक गेल्या २० वर्षांपासून वाट पाहत होते.

राज-उद्धव यांचा पहिला व्हिडिओ (Raj-Uddhav Thackeray Together First Video)

सर्वात आधी राज ठाकरे मंचावर आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मंचावर आले आणि राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हाताची मूठ करुन हात वर केला. एका बाजूला राज ठाकरेंना सर्वांना हात दाखवला. या दोन्ही भावांना एकत्र पाहून मराठी माणसांना खूप आनंद झाला आहे. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पुन्हा व्यासपीठावर आले. यानंतर दोघेही ठाकरे बंधू मराठीसाठी आपली ठाम भूमिका मांडणार आहेत.

राज ठाकरे- उद्धव ठाकरे महाराष्ट्राला संबोधणार

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळी डोम येथे संपूर्ण महाराष्ट्राला संबोधणार आहेत. मराठी भाषेचा अपमान होऊ नये, यासाठी ठोस पाऊले उचलायला हवी असं सांगणार आहे. मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत हे महाराष्ट्राला दाखवून देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT