मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
हवामान खात्याने २१ जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट
मुंबईमध्ये पुढचे २ दिवस पावसाची शक्यता
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा
राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. एकीकडे उन्हाचा कडाका तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे असणार आहे. राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. विदर्भासाठी पुढचे काही दिवस महत्वाचे राहणार आहेत. या ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.
आज चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ७ जिल्ह्यांना पुढील ४८ तासांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. विदर्भात १८, १९ तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये कलिंगड आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. लातूरमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसला. ज्वारी हरभरा यासह आंबा, टरबूज फळबागांचे नुकसान झाले. लातूरमध्ये देखील अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेले ज्वारी हरभरा, यासह अंबा आणि टरबूज या फळबाग शेतीचे मोठं नुकसान झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.