Maharashtra Monsoon  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Weather: मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कुठे येलो तर कुठे ऑरेंज अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Pre Monsoon Rain: राज्यात पूर्व मान्सून पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजचा देखील दिवस खूप महत्वाचा आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

Priya More

मान्सूनपूर्व पाऊस राज्यात धुमाकूळ घातलाना दिसत आहे. या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबााचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. सध्या राज्यात मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच जोर धरताना दिसत आहे. आज कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड आणि पुण्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.

आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, पुणे जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

त्याचसोबत उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचसोबत मच्छीमारांनी देखील खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT