MAHARASHTRA WEATHER UPDATE Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert: पुढचे ३ दिवस पाऊस झोडपून काढणार, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

MAHARASHTRA WEATHER UPDATE: राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाचे असणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Priya More
  • पुढील ३ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

  • महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट

  • कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

  • नंदुरबारमध्ये सर्वाधिक पावसाची तूट

सागर आव्हाड, पुणे

यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा ४७ टक्के पावसाची तूट पाहायला मिळाली. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसानंतर जून महिन्यातील काहीसी तूट कमी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्याचा विचार केला तर राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबारमध्ये झाला असून सरासरीपेक्षा ७६ टक्के पावसाची तूट आहे. तर सर्वात जास्त पाऊस पुणे, रायगड, रत्नागिरी येथील घाटमाथ्यावर झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ.एस.डी.सानप यांनी दिली.

हवामान विभागाचे प्रमुख डॉ.एस.डी.सानप यांनी सांगितले की, सध्या मान्सून सक्रिय आहे पण पाऊस जास्त कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भ येथे पडताना दिसत आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. पुढील काही दिवसांचा विचार केला तर कोकण किनारपट्टी येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील ३ दिवस घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ येथे देखील पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट असेल. त्यानंतर तिथे यलो अलर्ट लागू राहील. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक असण्याचा अंदाज आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र पुढील ३ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

  1. महाराष्ट्रातील यलो आणि ऑरेंज अलर्ट जिल्हे

  2. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

  3. नंदुरबारमध्ये सर्वाधिक पावसाची तूटआणि मराठवाडा या दोन्ही विभागांसाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. या भागात पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असेल असा अंदाज आहे. यंदाच्या पावसाळ्याचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ७६% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. तर पुण्याच्या घाटमाथ्यावर सरासरीपेक्षा ५०% अधिक पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ३० टक्क्यांहून अधिक तूट आहे. तसेच बीड येथे सरासरी २०२ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ १११.४ मिमी पाऊस झाला असून ४५% तूट आहे.

नांदेड येथे सरासरी २८७.३ मिमी ऐवजी १५९.७ मिमी पाऊस पडल्याने ४४% तूट नोंदवली गेली आहे. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कोणतेही नवीन कमी दाबाच क्षेत्र सक्रिय नाही. मात्र, मान्सूनची ट्रफ रेषा सध्या भारताच्या उत्तरेकडील भागाकडे सरकली आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या मान्सूनचे वारे सक्रिय असले तरी देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचाच पाऊस असणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना भाजपकडून मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवस्थानातील कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांच्या भावाकडून शिवीगाळ केल्याचा आरोप

Tomato storage: टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवावेत की नाही?

Skipping Dinner Benefits: रात्रीचं जेवण बंद केल्यावर डेली रुटीनमध्ये काय बदलं होतो? जाणून घ्या ७ महत्त्वाचे परिणाम

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर ठिय्या, राहुल गांधींच्या ५ मागण्या कोणत्या?

SCROLL FOR NEXT