Mumbai Local  Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! मुंबई लोकलचे रखडलेले १६२०० कोटींचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार

Mumbai Local : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेने १६,२४१ कोटी रुपयांचे १२ प्रकल्प मंजूर केले आहेत. याशिवाय, प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी २३८ नवीन वातानुकूलित लोकल सुरू होणार आहेत.

Alisha Khedekar

  • भारतीय रेल्वेने १६,२४१ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांना मंजुरी दिली असून, हे प्रकल्प मुंबईतील रेल्वेची कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढवतील.

  • लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी २३८ नवीन एसी लोकल सुरु होणार असून, स्वयंचलित दरवाजांमुळे सुरक्षितता वाढेल.

  • हे प्रकल्प पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवरील प्रवास सुधारतील आणि दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना दिलासा देतील.

  • सीएसएमटी, बोरिवली, विरार, कल्याण, बदलापूर, डहाणू यांसारख्या प्रमुख मार्गांचा समावेश यामध्ये असून, शहरातील गर्दी नियंत्रणात येणार आहे.

मुंबई लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आणि यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षितता आणि नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई उपनगरीय नेटवर्कमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी १६,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत . या प्रकल्पांचा उद्देश कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि रेल्वेचे कामकाज अधिक सुरळीत करणे आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेला पत्र लिहून सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या राजधानीत उपनगरीय रेल्वे सेवा अधिक वाढविण्यासाठी सरकारने १६,२४१ कोटी रुपयांच्या १२ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर हे उत्तर देण्यात आले.

मुंबईतील १२ उपनगरीय रेल्वे प्रकल्प

  1. सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी लाईन (एमयूटीपी-II), १७.५ किमी, ₹८९१ कोटी

  2. मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी लाईन (MUTP-II), ३० किमी, ₹९१९ कोटी

  3. गोरेगाव-बोरिवली (MUTP-IIIA) हार्बर लाईनचा विस्तार, ७ किमी, ८२६ कोटी रुपये

  4. बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी लाईन (MUTP-IIIA), २६ किमी, ₹२,१८४ कोटी

  5. विरार-डहाणू रोड तिसरा आणि चौथा मार्ग (MUTP-III), ६४ किमी, ₹३,५८७ कोटी

  6. पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (MUTP-III), २९.६ किमी, ₹२,७८२ कोटी

  7. ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (MUTP-III), ३.३ किमी, ४७६ कोटी रुपये

  8. कल्याण-आसनगाव चौथी लाईन (MUTP-IIIA), ३२ किमी, ₹१,७५९ कोटी

  9. कल्याण-बदलापूर तिसरा आणि चौथा मार्ग (MUTP-IIIA), १४ किमी, ₹१,५१० कोटी

  10. कल्याण-कसारा तिसरी लाईन, ६७ किमी, ७९३ कोटी रुपये

  11. नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड लाईन, ६ किमी, १७६ कोटी रुपये

  12. निळजे-कोपर डबल कॉर्ड लाईन, ५ किमी, ₹३३८ कोटी

मुंबईकरांना मिळणार नव्या वातानुकूलित लोकल

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई लोकलच्या अपघातामध्ये अनेकांचे जीव पणाला लागले आहेत. लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असून अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करताना दिसतात. परिणामी प्रवासादरम्यान धोके वाढत आहेत. यावर उपाय म्हणून रेल्वेकडून स्वयंचलित दरवाजे असलेल्या वातानुकूलित लोकल चालवण्यात येत आहेत. त्यात आणखी भर पडणार आहे.

या वातानुकूलित लोकलमुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार होत असून, दरवाजात लटकून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण शून्य झाले आहे. तसेच गर्दीमय प्रवासातून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून २३८ नवीन वातानुकूलित लोकलचे रेक सुरू करण्यात येणार आहेत. वातानुकूलित लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे प्रवाशांना लोकलच्या पायदानावर लटकण्यापासून किंवा धावत्या लोकलमध्ये चढण्या-उतरण्यापासून थांबवणे शक्य होणार आहे.मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अशा विविध प्रकल्पांमुळे मध्य, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवांचा चेहरा बदलणार आहे.

भारतीय रेल्वेने मुंबईसाठी कोणते नवीन प्रकल्प जाहीर केले आहेत?

भारतीय रेल्वेने १६,२४१ कोटी रुपये खर्चाचे १२ उपनगरीय रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत, ज्यामध्ये विविध मार्गांचे चौपदरीकरण, विस्तार व नवीन जोडणी यांचा समावेश आहे.

यामुळे प्रवाशांना काय फायदा होणार?

प्रवास सुलभ होणार असून गर्दी कमी होईल. AC लोकल्समुळे सुरक्षेत वाढ होईल व दरवाजात लटकण्याचे प्रकार थांबतील.

किती एसी लोकल गाड्या सुरू होणार आहेत?

एकूण २३८ वातानुकूलित लोकल रेक्स मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहेत.

कोणते महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प यात समाविष्ट आहेत?

CSMT-कुर्ला 5th-6th लाइन, मुंबई सेंट्रल-बोरिवली 6th लाइन, बोरिवली-विरार, पनवेल-कर्जत, विरार-डहाणू, ऐरोली-कळवा लिंक, कल्याण-आसनगाव, नायगाव-जुईचंद्र आदी १२ प्रकल्प.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT