Surabhi Jayashree Jagdish
तुंगारेश्वर धबधबा हा वसई जवळील एक प्रसिद्ध असा सुंदर धबधबा आहे.
तुंगारेश्वर पर्वतरांगेत असलेला हा धबधबा एक धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो.
तुंगारेश्वर परिसरात एक शिवमंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूने थोडं पुढे गेल्यावर हा धबधबा लागतो. पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह सुंदर दिसतो
धबधब्याच्या आजूबाजूला झाडी, आणि थंड वारा यामुळे निसर्गाचा अनुभव मिळतो
मुंबई किंवा विरारहून वसई रोड रेल्वे स्टेशन गाठा. वसई स्टेशनच्या पूर्वेकडील बाहेरच्या भागातून तुंगारेश्वर मंदिराकडे जाणारी रिक्षा किंवा गाडी घ्या.
तुंगारेश्वर मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाडीने जाता येतं. तिथून साधारण एक ते दीड किलोमीटर चालत मंदिर गाठता येतं
मंदिर गाठल्यानंतर पाठीमागे असलेल्या जंगलातून आणि उतारावरून चालत धबधब्याजवळ जाता येतं
वसई स्टेशनपासून तुंगारेश्वर मंदिर अंदाजे १० किलोमीटर अंतरावर आहे. वसईहून गाडीने साधारण २५ ते ३० मिनिटांचा प्रवास आहे. मुंबईहून पूर्ण प्रवास एक ते दीड तासात करता येतो