Nagaradhyaksha Atul Chogle Saam Tv
महाराष्ट्र

Politics: ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आला, लगेच शिंदेंच्या शिवसेनेत गेला; तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राजकारण घडलं

Nagaradhyaksha Atul Chogle: रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेले आणि नगराध्यक्षपदी विजयी झालेले अतुल चोगले यांनी शिंदेगटात जाण्याचा निर्णय घेतला.

Priya More

Summary -

  • रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

  • नगराध्यक्ष अतुल चोगले शिंदे गटात जाणार

  • विजयानंतर भरत गोगावले यांनी घेतली भेट

  • शिंदे गटाची कोकणात ताकद वाढणार

रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. नगराध्यक्षपदी विजयी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल चोगले शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आल्यानंतर लगेचच नगराध्यक्ष झालेल्या अतुल चोगले यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या अतुल चोगले यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. नगराध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर अतुल चोगले यांच्या भेटीला शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले आले होते. त्यानंतर त्यांनी शिंदेगटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

विजयानंतर भरत गोगावले यांनी नगराध्यक्ष अतुल चोगले यांना मिठी मारली आणि त्यांचे स्वागत केले. यावेळी माझ्या विजयात भरत गोगावले यांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे अतुल चोगले यांनी मान्य केले. प्रवेशाबाबत कोणतही बोलण झालं नसल्याचे चोगले यांनी सांगितले. अतुल चोगले हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

saunf jeera water: दिवसाची सुरुवात बडीशेप आणि जीरा पाणी पिऊन करण्याचे काय फायदे आहेत?

Maharashtra Live News Update : पुणे शहरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका करू नका, होईल मोठं नुकसान

Makar Sankranti 2026: मकरसंक्रातीला खिचडी दान केल्याने काय होतं?

Goa Tourism : फुल टू धमाल! 'गोव्यातील' Hidden पिकनिक स्पॉट, वीकेंड होईल खास

SCROLL FOR NEXT