रायगड म्हसळ्यात शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसलाय.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले 7 नगरसेवक अपात्र ठरेलत.
पक्षांतर बंदी कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय दिलाय.
सचिन कदम, साम प्रतिनिधी
रायगड म्हसळ्यात शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणारे ७ नगरसेवक अपात्र ठरले आहेत. दोन महिन्यांपूर्वी या ७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. या सात नगरसेवकांविरोधात रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या म्हसळा नगरपालिकेच्या ७ नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे. यामुळे रायगडमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
पक्षांतर बंदीसाठी असलेल्या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६चे कलम ३ ( २ ) आणि १९८७ चे नियम ८ (१ ) मधील तरतुदींनुसार हा निकाल दिला आहे. यामध्ये नगराध्यक्षा फरहिन अ.अजीज बशरत आणि कमल रवींद्र जाधव, मेहजबिन नदीम दळवी, असहल असलम कादिरी, सुमैया कासम आमदानी, सारा अ.कादीर म्हसलाई, शाहिद सईद जंजिरकर यांचा समावेश आहे. २०२३ मध्ये म्हसळा नगरपंचायतीची निवडणूक झाली होती. यावेळी हे ७ नगरसेवक राष्ट्रवादी पक्षातून निवडून आले, मात्र गतवर्षी झालेल्या मतभेदानंतर नोव्हेंबर महिन्यात या सात नगरसेवकांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.