कर्जतमध्ये भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
खासदार सुनील तटकरे यांच्या सत्कार कार्यक्रमातून हा पक्ष प्रवेश झाला.
अजित पवार यांचा शिवसेना आणि भाजपला धक्का दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जातं आहे. जो- तो पक्ष आपली ताकद वाढवत आहे. याच ताकद वाढवण्याच्या नादात महायुतीमधील पक्ष एकमेकांचे नेते पळवत आहेत. आज कर्जतमध्ये शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
रायगडच्या कर्जतमध्ये आज राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमातून अजितदादांनी डाव साधला. शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कर्जत खालापूर मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शिवसेना सह सर्पक प्रमुख सुनिल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
त्यांच्यासह रायगड उत्तर भाजप महिला अध्यक्षा अश्विनी पाटील भाजप शहर अध्यक्ष राहुल जाधव याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफ्फूल पटेल, खासदार सुनिल तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 'पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले. त्यानंतर लागलीच कर्जतमध्ये भाजप आणि शिवसेनेला राष्ट्रवादीने जोरदार धक्का दिला.
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्वबळाचे संकेत दिले. शहरातील विकास काम करण्यासाठीची क्षमता आणि ताकद आमच्यामध्ये आहे.
त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मी दिलेल्या उमेदवाराच्या पाठिशी तुम्ही उभे राहा, त्यांना निवडून द्या', असे आवाहन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळाबाबत मोठं विधान केलं. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.