मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे सोशल मीडिया हॅक, खात्यावर पाकिस्तानचे व्हिडिओ

Eknath Shinde’s X account hacked with Pakistan videos : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स खाते हॅक झाले असून, त्यावर पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde’s X account hacked with Pakistan videos
Eknath Shinde’s X account hacked with Pakistan videos
Published On
Summary
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स खाते हॅक झाले.

  • पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट झाले.

  • महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

  • सायबर हल्ल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले.

Eknath Shinde Twitter hack latest update : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स (ट्वीटर) खाते हॅक झाले. त्यांच्या खात्यावर पाकिस्तान अन् तुर्की येथील व्हिडिओ दिसत होते. त्यांचे खाते सध्या रिकव्हर करण्यात आले आहे. पण उपमुख्यमंत्र्यांचे खातेच हॅक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. राजकीय नेत्यांच्या सायबर हल्ल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत एक्स (Twitter) खाते हॅक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या खात्यावरून पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट झाले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. थोड्या वेळात एकनाथ शिंदे यांचे एक्स खाते रिकव्हर कऱण्यात आले आहे. पण ही घटना उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेप मानली जात आहे. सायबर पोलिसांकडून या घटनेचा तपास कऱण्यात येत आहे. खाते कुणी हॅक केले? याचा शोध घेतला जात आहे. सायबर पोलिसांकडून आयपी अॅड्रेस तपासले जात आहे. हे खाते कुठून हॅक करण्यात आले, त्यामागील हेतू काय होता? याचा शोध घेतला जात आहे.

Eknath Shinde’s X account hacked with Pakistan videos
Amul Price Cuts : आनंदाची बातमी! तूप ₹४० स्वस्त, अमूलने ७०० उत्पादनांच्या किमती केल्या कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com