Husband Killed By Wife In Khopoli Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: अनैतिक संबंधाचा संशय, पत्नीने काढला पतीचा काटा; झोपेत असतानाच केली हत्या

Husband Killed By Wife In Khopoli: पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने त्याची हत्या केली. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

Priya More

रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये (Khopoli) धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या घटनेमुळे खोपोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने त्याची हत्या केली. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी (Khopoli Police) आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील शिळफाटा परिसरातील मीळ गावामध्ये ही घटना घडली आहे. असरद अली (३४ वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. असरद अली आपल्या पत्नी आणि मुलांसोबत मीळ गावातील नवीन वसाहतीत राहत होता. रविवारी पहाटे असरद अलीची हत्या झाली. असरद अली हा क्रेन ऑपरेटर होता. रविवारी पहाटे असरदची पत्नी दरवाजामध्ये जोरजोरात रडत बसली होती. तिचा आवज ऐकून शेजारी राहणाऱ्या लोकांनी असरदच्या घराकडे धाव घेतली.

असरद रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता तर त्याच्या मुलीचे हात रक्ताने माखलेले होते. हे चित्र पाहून शेजारी राहणाऱ्यांना धक्का बसला. स्थानिकांनी तात्काळ यासंदर्भात खोपोली पोलिसांना माहिती दिली. खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता असरदच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली असल्याचे समोर आले. पोलिसांनी असरदचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला.

पोलिसांनी यावेळी असरदच्या पत्नीची विचारपूस केली तर तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. यावेळी पोलिसांनी श्वान पथकाला देखील घटनास्थळी पाचारण केले होते. श्वासाने असरदच्या घरामध्ये सगळीकडे वास घेतला. त्यानंतर श्वास असरदच्या पत्नीच्या जवळच जाऊन थांबला. त्यामुळे पोलिसांनी असरदच्या पत्नीला अनेक प्रश्न केले पण तिने व्यवस्थित उत्तरं दिली नाही त्यामुळे त्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. असरदच्या पत्नीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करत तिला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhwar Peth : बुधावर पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्यांचा पाठलाग करायचं अन् लुटायचे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Home Made Upvasfood: श्रावण आला की उपवास आलाच! हे पदार्थ आधीच बनवा आणि ठेवा स्टोअर करून

Shocking News : मैत्रिणीनेच रचला कट, १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: फक्त १ मिनिटं उशीर झाल्याने परीक्षेचा बसून दिले नाही, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Gold Price :सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

SCROLL FOR NEXT