Khopoli News  Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: नेरुळमधून दोघे बेपत्ता, इस्टेट एजंचा मृतदेह सापडला; दुसरा अजूनही बेपत्ता

Navi Mumbai Police: नवी मुंबईतून बेपत्ता असलेला इस्टेट एजंट सुमित जैन याचा मृतदेह पेण-खोपोली मार्गावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

नवी मुंबईच्या नेरूळ येथून बेपत्ता झालेल्या झालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. इस्टेट एजंटचा पेण-खोपोली मार्गावर मृतदेह आढळून आला. तर दुसरा अजूनही बेपत्ता आहे. दोघेही बेपत्ता झाल्याची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिस त्यांचा शोध घेत होते. आज एकाचा मृतदेह आढळला तर दुसऱ्याचा पोलिस शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतून बेपत्ता असलेला इस्टेट एजंट सुमित जैन याचा मृतदेह पेण-खोपोली मार्गावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सुमित जैन याची कार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सापडली होती.या कारवर फायरिंग झाली होती. त्यामुळे बेपत्ता सुमित जैनचा तपास पोलिसांनी अधिक वेगाने सुरु केला.

तर पेण-खोपोली मार्गावर गागोदे गावाच्या हद्दीतील जंगल भागात सुमित जैन यांचा मृतदेह सापडला. सुमित जैन याच्यासोबत अमीर खान नावाची व्यक्ती देखील होती. अमीर खान बेपत्ता असल्याची तक्रार नेरूळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सुमित जैन यांचा मृतदेह सापडला. पण बेपत्ता असलेल्या अमिर खानच काय झालं? याचा तपास नेरूळ, खोपोली आणि पेण पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT