Raigad saam tv
महाराष्ट्र

बोटीतून प्रवासी पडला समुद्रात; पोहता येत असल्याने वाचला

बोटीतून प्रवासी पडला समुद्रात; पोहता येत असल्याने वाचला

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड : मुंबई गेटवे येथून सकाळी मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी समुद्रात पडला. प्रशांत कांबळे असे या प्रवाशांचे नाव असून त्याला पोहता येत असल्याने वाचला आहे. स्वतःच्या चुकीमुळे बोटीतून पडला असल्याने याबाबत कोणतीही तक्रार पोलीस (Police) ठाण्यात दाखल झालेली नाही. (raigad news passenger from the boat fell into the sea)

प्रशांत कांबळे हा प्रवासी सकाळी नऊ वाजताच्या (Raigad News) अजंठा बोटीने गेटवे येथून मांडवाकडे निघाला होता. यावेळी बोटीच्या एका बाजूला प्रशांत उभा होता. त्यावेळी बोटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी उभे राहू नका असे सांगितले होते. मात्र प्रशांत याने तिकडे दुर्लक्ष केले आणि काही वेळाने तो समुद्रात (Sea) पडला. प्रश्नात हा सामानासकट पडला होता. त्याला पोहता येत असल्याने बोटीपर्यत पोहत आला. बोटीतून त्याला दोरी टाकून खेचण्यात आले त्यामुळे तो बचावला.

चुक केली कबुल

प्रशांत याने मी स्वतःच्या चुकीने पडलो असल्याचे मांडवा पोलिसांना सांगितले. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र अजंठा बोटीमधून प्रवास करताना अनेकवेळा प्रवासी हे जीव मुठीत घेऊन प्रवास करतात हे मात्र नक्की. त्यामुळे प्रवाशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजंठा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत महाराष्ट्र मेरिटाईम विभागाने अजंठा बोटीची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT