Sakshi Sunil Jadhav
ज्योतिष गणनेनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ पासून बुध आणि शनीच्या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होणार आहे. या दिवसांमध्ये काहींना आर्थिक, मानसिक, व्यावसायिक आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून ६ आणि ८ भावांच्या स्थितीत म्हणजेच १५० अंशांच्या अंतरावर असतात, तेव्हा षडाष्टक योग तयार होतो.
मेष राशीच्या व्यक्तींना सहकारी किंवा वरिष्ठांसोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असून, रागावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं असेल.
कर्क राशीच्या लोकांच्या अनावश्यक खर्चात वाढ होऊन आर्थिक बजेट बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैशांचे व्यवहार जपून करा.
तुळ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हवामानातल्या बदलामुळे त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी.
मकर राशीच्या जातकांना व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो आणि ठरवलेली कामं वेळेत पूर्ण न झाल्याने तणाव वाढू शकतो.
या काळात मोठी गुंतवणूक, कर्ज देणे किंवा उधारीचे व्यवहार करण्यापूर्वी योग्य विचार करणे हिताचे ठरू शकते.
वरील माहिती ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे; याला वैज्ञानिक आधार असल्याचे सिद्ध झालेले नाही.