सावदा (जळगाव) : आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष लढले. शरद पवार आणि राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा देऊन कार्यकर्त्यांच्या मेहनतीने निवडून आणले. मात्र त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा न देता ते मातोश्रीवर गेले. त्यांना वाटले (BJP) भाजप- सेनेची सत्ता येईल. आताही त्यांची पावले ही जामनेरमार्गे भाजप अशी पडत आहेत, अशी टिका (NCP) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी शरद युवा संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केली. (Elected with the support of NCP went to matoshri Criticism of MLA Chandrakant Patil)
पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर व्यासपीठावर जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर (Rohini Khadse), ज्येष्ठ नेते प्रल्हाद बोंडे, नीळकंठ चौधरी, सचिन पाटील, दीपक पाटील, योगेश पाटील, जिल्हा सरचिटणीस एजाज गफ्फार मलिक आदी उपस्थित होते.
आता सर्वच संस्थांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता
महेबूब शेख म्हणाले, हा परिसर शरद पवार (Sharad Pawar) आणि नाथाभाऊ यांच्या विचारांना मानणारा आहे. आता हे दोघे नेते एकत्र आले असल्याने सर्वच संस्थांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येईल. निवडून आल्यावर मी राष्ट्रवादीत येतो, परंतु खडसेंना प्रवेश देऊ नका, अशी अट आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी घातली होती. परंतु शरद पवार हे पूर्ण महाराष्ट्राचा विचार करतात, एका मतदारसंघाचा नाही. म्हणून आमदार पाटील यांचे न एकता खडसे यांना पक्षात प्रवेश दिला. नाथाभाऊ पक्षात आल्याने उत्तर महाराष्ट्रासह (Maharashtra) राज्यात पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे, असे सांगितले. रोहिणी खडसे म्हणाल्या, की युवकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शरद युवा संवाद यात्रा आहे. कार्यकर्त्यांनी आता घराघरांत जावून पक्षाचे कार्य पोहोचविले पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.