शहादा (नंदुरबार) : टेंभा त.सा. (शहादा) शिवारात ट्रान्सफार्मरवरील वीज वाहिनीची तार तुटून झालेल्या शॉर्टसर्किटनंतर लागलेल्या आगीत सुमारे ५० एकर ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी शहादा येथील (Satpuda) सातपुडा, समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याच्या (Sugarcane Factory) शेतकी अधिकाऱ्यांनी भेट दिल्याचे समजते. (nandurbar news Sugarcane acreage on 50 acres Wire break and short circuit)
टेंभा त.सा.(ता. शहादा) शिवारात सोमवारी (ता.७) दुपारी एकला शॉर्टसर्किटने उसाच्या शेताला आग लागली. चेतन विनोद पाटील यांच्या शेतावर (Farmer) असलेल्या डीपीलगत सलग नऊ ते दहा क्षेत्रांमध्ये उसाचा पेरा असल्याने ही आग एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये लागून आगीने रौद्र रूप धारण केले. यामुळे जवळपास ५० एकरावरील उसाचे (Sugarcane) नुकसान झाले. दुपारी एकला उन्हाचा पारा चढला असताना तसेच सोसाट्याचा वाराही वाहत असल्याने या आगीला रुद्र रूप धारण करायला वेळ लागला नाही.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे अशी
जगतसिंग रजेसिंग गिरासे, मनीषा जगतसिंग गिरासे, छोटूलाल भिला पाटील, शिवदास बाबू पाटील, विलास बंशी पाटील, वसंत बन्सी पाटील, अशोक गुलाल पाटील यांचे दोन गट, राजेंद्र रामदास पाटील यांचे दोन गट, दौलतसिंग सुरतसिंग गिरासे, रमेश दामू पाटील, पुरुषोत्तम वल्लभ पाटील या शेतकऱ्यांच्या शेतावरील उसाचे नुकसान झाले असून अजून काही शेतकऱ्यांची नावे मिळू शकली नाहीत. दरम्यान डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी तत्काळ समशेरपूर येथील आयान शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी ए. आर. पाटील, शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी अजित सावंत यांनी पाहणी करून दोन्ही साखर कारखान्याचे ऊसतोड यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.