Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad News : सुटी असल्याने मित्र गेले पर्यटनाला; कुंडलिका नदीत पोहण्यासाठी उतरले असता एकाचा बुडून मृत्यू

Raigad News : भिरा कॉलनी परीसरात संकेत परळकर हा आपल्या मित्रासोबत पुणे येथून मोटार सायकलने माणगाव येथे पर्यटनासाठी आला होता. माणगाव तालुक्यातील भिरा येथील कुंडलिका नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: सुटी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेले असता रायगडच्या माणगाव तालुक्यातील भिरा कॉलनी परिसरात असलेल्या कुंडलिका नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा बुडून मुत्यु झाला आहे. संकेत परळकर (वय २१) मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नांदेड येथील रहिवाशी आहे. 

भिरा कॉलनी परीसरात संकेत परळकर हा आपल्या मित्रासोबत पुणे येथून मोटार सायकलने माणगाव येथे पर्यटनासाठी आला होता. माणगाव तालुक्यातील भिरा येथील कुंडलिका नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहा बरोबर दोघेही (death) वाहून गेले. त्यातील एकाला आपला जीव वाचवण्यात यश आले. मात्र संकेत पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.  

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश शेलार मामा यांना हि घटना काळताच त्यांच्या टिमने शोधाशोध करत मोहिम राबविली. शोधकार्य करत वाहून गेलेल्या संकेतच मृतदेह शोधुन काढला. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करून माणगाव पोलिस (Police) या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

IPL Success Story: बापाची जिद्द, पोराची मेहनत, कर्ज काढून क्रिकेट खेळायला पाठवलं, शहापूरचा लेक IPLमध्ये खेळणार

Pune : मोठी बातमी! भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले, आयोगाची मोठी कारवाई

रात्रीच्या अंधारातही मांजरीला शिकार कशी दिसते?

SCROLL FOR NEXT