Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील खरीपच्या नुकसानीचे विमा वितरण; १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात होणार रक्कम जमा

Dharashiv News : मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. पिकांना संरक्षण म्हणून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेत सहभागी होत पीक विमा उतरविला होता
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२३ मध्ये सुरूवातीला पावसातील खंड व नंतरच्या अवकाळी पावसाने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान आठवडाभरात १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे; अशी माहिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.  

Crop Insurance
Mahavitaran Bill : भर उन्हाळ्यात महावितरणचा ग्राहकांना शॉक; रिडींग न घेताच सरासरी बिल

मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. पिकांना संरक्षण म्हणून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेत सहभागी होत पीक विमा उतरविला होता. (Dharashiv) दरम्यान खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा व अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र कंपनीकडून यास विलंब झाला होता. यानंतर अखेर आता नुकसान भरपाईची रक्कम देण्यास सुरवात केली आहे. 

Crop Insurance
Marathwada Dushkal: पाणी- चाऱ्याअभावी पशुधनाची विक्री; शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न

शेतकऱ्यांना (Farmer) नुकसान भरपाई खात्यात देण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली असुन तक्रार दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना ही विमा वितरीत करण्याचे सुचित केले आहे. आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्याच्या सुचना विमा कंपनीला देण्यात (Crop Insurance) आल्या आहेत. खरीप पेरणीच्या तोंडावर पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त केल जात आहे. तर खरीप २०२० व २०२१ मधील ही उर्वरित विमा रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com