Marathwada News: पाणी- चाऱ्याअभावी पशुधनाची विक्री; शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न
Sale of animals due to lack of water in MarathwadaSaam TV

Marathwada Dushkal: पाणी- चाऱ्याअभावी पशुधनाची विक्री; शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न

Chhatrapati Sambhaji Nagar News: मराठवाड्यामध्ये सध्या शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईमुळे अनेक ठिकाणी दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे
Published on

छत्रपती संभाजीनगर : कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती सर्वत्र आहे. पाण्याची टंचाई जाणवत असतानाच गुरांसाठीच्या चाऱ्याची देखील टंचाई भासू लागली आहे. यामुळे पालन केलेल्या गुरांना दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा कोठून आणायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी मिळेल त्या किमतीत पशुधन विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.   

Marathwada News: पाणी- चाऱ्याअभावी पशुधनाची विक्री; शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न
Bribe Case : गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी २५ हजाराची मागणी; महिला तलाठी एसीबीच्या ताब्यात

मराठवाड्यामध्ये (Marathwada) सध्या शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईमुळे अनेक ठिकाणी दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. शिवाय टँकरच्या पाण्यावर माणसाची तहान भागवण्याची वेळ आल्यानं पशुधनासाठी लागणारे पाणी आणि चारा आणायचा कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे जिवापाड जपलेल्या जनावरांना बाजारात मिळेल त्या भावात विकताना (Farmer) शेतकरी दिसत आहेत. यामुळेच पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातील अनेक ठिकाणच्या बैल बाजारात बैल विक्रीची संख्या वाढली आहे. 

Marathwada News: पाणी- चाऱ्याअभावी पशुधनाची विक्री; शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न
Mahavitaran Bill : भर उन्हाळ्यात महावितरणचा ग्राहकांना शॉक; रिडींग न घेताच सरासरी बिल

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील वैजापूर जवळच्या महालगाव इथल्या बैल बाजारात आज मोठ्या संख्येने बैल विक्रीला आले आहेत. माणसांना पिण्यासाठी पाणी नाही; तर जनावरांना आणायचं कुठून? असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात चाराही आता संपत (drought) आल्यामुळे घराच्या दावणीला बांधण्यापेक्षा मिळेल त्या किमतीवर बैल विक्री करताना शेतकरी दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com