Mahavitaran Bill : भर उन्हाळ्यात महावितरणचा ग्राहकांना शॉक; रिडींग न घेताच सरासरी बिल

Nandurbar News : अधिकृत वीज कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना नियमानुसार मीटर रिडींग घेऊन बिल आकारणी करणे आवश्यक आहे
Mahavitaran Bill
Mahavitaran BillSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : महावितरणचा अजब कारभार शहाद्यामध्ये पाहण्यास मिळत आहे. घरोघरी जाऊन मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी केली जात आहे. हा प्रकार मागील चार- पाच महिन्यांपासून केला जात आहे. यामुळे अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.  

Mahavitaran Bill
Bhiwandi News : सुरत येथे बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला निर्मिती; भिवंडीत विक्री करणाऱ्या दोघे मुद्देमालासह ताब्यात

अधिकृत वीज कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना नियमानुसार मीटर रिडींग घेऊन बिल आकारणी करणे आवश्यक आहे. मात्र नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा शहरात वीज वितरण कंपनीकडून शहरातील नियमित वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवून अव्वाच्या सव्वा वीज बिल वसूल केले जात आहे. मीटर सुरू असूनही ग्राहकांना सरासरी बिल पाठविल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Mahavitaran Bill
Bribe Case : गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी २५ हजाराची मागणी; महिला तलाठी एसीबीच्या ताब्यात

वीज वितरण (Mahavitaran) कंपनीकडून जानेवारी महिन्यापासून अत्याधुनिक वीज मीटर बसविण्यासोबत नवीन तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष रिडिंग न घेता डिजिटल वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. गेल्या तीन- चार महिन्यांपासून नियमित वीज ग्राहकांना प्रत्यक्ष रिडिंग न घेता वीज वितरण कंपनीकडून सरासरी वीज बिलांचे वाटप केले जात आहे. या बिलांवर वीज रिडिंग उपलब्ध नाही; असे नमूद करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com