Boycott Lok Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Boycott Election : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; प्रांताधिकाऱ्यांची बैठक असफल

Raigad News : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या बाळगंगा धरण साधारण १३ वर्षांपूर्वी सुरू होऊन सध्या या धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे

Rajesh Sonwane

सचिन कदम 

रायगड : पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर (Raigad) कायम आहेत. आज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी वरसई येथील मंदिरात बैठक घेवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला.  

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या बाळगंगा धरण साधारण १३ वर्षांपूर्वी सुरू होऊन सध्या या धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. धरणाच्या प्रकल्पग्रस्त ६ गावांमध्ये जवळपास ८ हजार मतदार आहेत. संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याबत इशारा देत पुनर्वसन करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा (Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकीचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. 

दरम्यान आतापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर कायम आहेत. (Raigad Lok Sabha) रायगड मतदार संघात ७ तारखेला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी यांनी प्रकल्पग्रस्थांची बैठक घेतली होती. मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने आजच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT