4 Youth Drowning Dam Near Khalapur Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: पिकनिकला जाणं जीवावर बेतलं, खालापूरजवळ धरणात बुडून मुंबईच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

4 Youth Drowning Dam Near Khalapur: मुंबईतल्या रिझवी कॉलेजच्या ४ तरुणांचा खालापूरनजीकच्या धरणामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हे तरुण पिकनिकसाठी याठिकाणी आले होते.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगडमधून (Raigad) मोठी बातमी समोर आली आहे. रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाचे ४ बळी गेले आहेत. मुंबईतून पावसाळी सहलीसाठी गेले असता ही घटना घडली. सत्य साईबाबा ट्रस्टने बांधलेल्या धरणात (Saibaba Dam) चार तरुण बुडाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. हे सर्व तरुण मुंबईतल्या नामांकित कॉलेजमध्ये शिकत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून ३७ तरुण आणि तरुणी पावसाळी सहलीसाठी रायगडमध्ये गेले होते. हे सर्वजण खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी येथे असलेल्या धरणावर सहलीसाठी गेले होते. हे धरण सत्य साईबाबा ट्रस्टने बांधले आहे. या धरणामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या ४ तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. हे चारही तरूण मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली.

तरुण धरणामध्ये बुडाल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या चारही तरुणांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने आणि रणत बंडा अशी मृत तरुणांची नावं आहेत. या चारही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. रायगड पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली आहे. तरुणांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT