Raigad News : वडाच्या झाडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; जखमींवर उपचार सुरु, VIDEO

Raigad Vat Purnima Bee attack : वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना रायगडच्या निवे गावात घडली आहे. या घटनेत १४ महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वडाच्या झाडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; जखमींवर उपचार सुरु
Raigad NewsSaam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

रायगड : वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील निवे गावात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्यभरातील महिला वर्गामध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. वटपौर्णिमानिमित्त अनेक विवाहित महिला वडाची पूजा करण्यासाठी बाहेर निघाल्या आहेत. राज्यभरातील विवाहित महिला वटपौर्णिमेमुळे उत्साहात असताना रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

वडाच्या झाडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; जखमींवर उपचार सुरु
Raigad Accident News: वाढदिवसालाच मृत्यूने गाठलं! पार्टीला जाताना भीषण अपघात, 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी अंत; गाडीचे २ तुकडे

रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील निवे गावातील विवाहित महिला वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. महिलांकडून वडाच्या झाडाची पूजा सुरु असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या मधमाशांच्या हल्ल्यानंतर १४ महिला जखमी झाल्या आहेत. या महिलांवर पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अकोल्यात विधवा महिलांनी केली वटपौर्णिमा

अकोल्यात समाजातील अनिष्ट रुढी, परंपरांना झुगारत विधवा, घटस्फोटित महिलांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाची पूजा केली. वटपूजा करताना अनेक महिला भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. तर काही महिलांना अश्रू अनावर झाले. 'स्त्री विकास फाउंडशेन'ने अनोख्या उपक्रमाला सुरूवात केली. स्त्री विकास फाउंडेशनच्या संस्थापक वैष्णवी दातकर यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी पुढाकार घेतला.

वडाच्या झाडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; जखमींवर उपचार सुरु
Latur Crime : चोरी करताना पहिले म्हणून विद्यार्थ्यांचा दगडाने ठेचून खून; अहमदपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

निसर्गपूजक स्त्रियांकडून वटपौर्णिमा साजरी

वटपौर्णिमेनिमित्त पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाची पूजा करण्यासाठी यवतमाळ शहरातील विविध ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. वडाच्या झाडाची पूजा करून हाच पती सात जन्म मिळावा, अशी प्रार्थना महिलांनी केली. यावेळी वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळत प्रार्थना करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com