Accused Anis Khan arrested by police in connection with the brutal rape and murder case in Lonere, Raigad. saam tv
महाराष्ट्र

लॉजवर नेऊन बलात्कार, नंतर तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी अनिस खानला अटक, धक्कादायक कारण समोर

Raigad Lonere Lodge Rape And Murder Case Details: रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे लॉजवर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड: लोणेरे येथील एका लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत (5 दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही दिवसांपूर्वी लोणेरे येथील लॉजवर एका 22 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस तपासात समोर आलेल्या महितीनुसार आरोपीने पीडित तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने तिचा खून केला.

या घटनेमुळे गोरेगाव परिसरात संतापाची लाट पसरली होती. गुन्हा घडल्यानंतर आरोपी मालदार पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याची 8 ते 10 पथके मागावर होती. अखेर सहा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी रात्री ठाणे परिसरातून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

आज आरोपीला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध याधीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले आणि यामागे आणखी काही करणे आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला सदस्यावर जीवघेणा हल्ला

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT