RAIGAD DIVEAGAR SEA TRAGEDY saam tv
महाराष्ट्र

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना घडली असून पुण्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीदरम्यान समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहेत.

Omkar Sonawane

रोहीदास गाडगे, साम टीव्ही

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी अत्यंत काळीज पिळवून टाकणारी घटना घडल्याने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. विनर्स अकॅडमीमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घेतले जातात. याच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची सहल रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्राचं नंदनवन अनुभवण्यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्हयात देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. सलग सुट्या आल्याने आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिवेआगर येथे आली होती. या सहलीमध्ये एकूण 42 विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये 17 मुली आणि 25 मुलांचा समावेश होता.

या घटनेत मृत्यू झालेल्या 8 मुलांची नावे समोर आली आहे.

1. राजवीर वाहिले

2. सोहम भांडवळकर

3. कौस्तुभ दोंड

4. यश वानखेडे

5. कैवल्य वासंकर

6. तन्मय वाहिले

7. सुमित अहिरे

8. प्रणव बनसोडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT