Raigad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Raigad Accident: रायगडमध्ये कारचालकाने वाहतूक पोलिसासह ३ जणांना धडक दिली. या अपघातामध्ये ते जखमी झाले. या घटनेनंतर कारचालक फरार झाला.

Priya More
  • मुंबई -गोवा महामार्गावर भीषण घटना

  • वाहतूक पोलिसासह ३ जणांना कारने उडवलं

  • माणगावमध्ये भरधाव कारचा थरार

  • रायगडमधील व्हायरल व्हिडीओ चर्चेत

सचिन कदम, रायगड

मुंबई- गोवा महामार्गावर बेरदरकार कारने एका वाहतूक पोलिसासह तीघांना उडवले. मुंबई- गोवा महामार्गावरील माणगाव येथील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध शुरू केला आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव आणि बेरदरकार कार चालकाने रायगडच्या माणगावमध्ये एका वाहतूक पोलिसासह तीघांना धडक दिल्याची घटना घडली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या कार चालकाला पोलिस आणि नागरिकांनी माणगाव म्हसळा रस्त्यावर साई गावाच्या हद्दीत पकडले. मुंबई- गोवा महामार्गावर ढालघर येथे या कार चालकाने दोन माणसांना कट मारला. बेरदरकार आणि भरधाव कारचा ग्रामस्थांनी पाठलाग केला.

माणगाव मोर्बा रोड येथे पोलिस आणि ग्रामस्थांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कार चालक वाहतूक पोलिस आणि दोन ग्रामस्थांना उडवत पळून गेला. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे माणगावमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT