Raigad Accident Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Accident: एसटी बसचा भीषण अपघात, ९ विद्यार्थी जखमी

Rohini Gudaghe

सचिन कदम, साम टीव्ही रायगड

रायगडमधून मोठी बातमी समोर येत आहे. पोलादपुर कुडपण रस्त्यावर एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसमधुन प्रवास करणाऱ्या तीस विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांना किरकोळ आणि मुकामार लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अपघातामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खड्डयात बस आदळल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

रायगड जिल्ह्यात भीषण अपघात झाला (Raigad Breaking) आहे. या एसटी बसमधून काही विद्यार्थी देखील प्रवास करत होते. जखमी विद्यार्थ्यांवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलादपुर कुडपण मार्गावर क्षेत्रपाळ गावच्या हद्दीत हा अपघात झालाय. रस्त्यामध्ये पडलेल्या खड्डयात बस आदळून अपघात झाल्याची माहिती मिळत (Bus Accident) आहे.

कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूरमध्ये देखील आज सकाळी एक अपघात झाला होता. हातकणंगलेमध्ये हा अपघात (Accident News) झालाय. पेट्रोल पंपासमोर दुचाकी आणि एसटीचा अपघात झालाय. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोलापूरहून कणकवलीला जाणाऱ्या एसटीला दुचाकी धडकली. त्यामुळे अपघात (Student Accident) झाला. या घटनेत जखमी झालेल्या दोन्ही तरूणांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT