Stampede Accident in India: हाथरस चेंगराचेंगरीनंतर जुन्या जखमा भळभळल्या; महाराष्ट्रातही 2005 मध्ये घडलं होतं भयंकर, देशभरातील घटनांमध्ये आतापर्यंत किती मृत्यू?

Hathras Stampede Like Accident in India: हाथरस चेंगराचेंगरीनंतर जुन्या जखमा भळभळल्या आहेत. महाराष्ट्रातही चेंगराचेंगरीची भयंकर घटना घडली होती. यात शेकडो लोकांनी जीव गमावले होते.
Stampede Cases in India: हाथरस चेंगराचेंगरीनंतर जुन्या जखमा भळभळल्या; महाराष्ट्रातही 2005 मध्ये घडलं होतं भयंकर, देशभरातील घटनांमध्ये आतापर्यंत किती मृत्यू?
Uttar Pradesh Hathras StampedeSaam TV
Published On

मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सत्संगमध्ये आलेल्या १२१ भक्तांचा चेंगराचेंगरीची मृत्यू झाल्याची घटना घडली. हाथरसमधील दुर्देवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच पाहायला मिळाला. या रुग्णालयाबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. देशात २००३ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत विविध भागात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. देशभरातील वेगवेगळ्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत आतापर्यंत शेकडो लोकांनी जीव गमावले आहेत.

देशात याआधी देखील धार्मिक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटना घडल्या आहेत. देशभरातील मागील काही काळात २९ दुर्दैवी घटना घडल्या आहेत. तर महाराष्ट्रात मांढरदेवी, नाशिकच्या कुंभमेळ्यातही चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दोन्ही दुर्घटनेत ३५० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला.

देशातील चेंगराचेंगरीच्या घटना

२७ ऑगस्ट २००३ : नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात ३९ जणांचा मृत्यू झाला होता. तर १४० जण जखमी झाले होते.

२५ जानेवारी २००५ : महाराष्ट्रातील मांढरदेवी मंदिर परिसरातही चेंगराचेंगरी घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत ३४० भाविकांचा मृत्यू झाला होता.

३ ऑगस्ट २००८ : हिमाचल प्रदेशात नैना देवी मंदिरात पादचाऱ्यांसाठी उभारलेले शेड कोसळलं होतं. या घटनेनंतर झालेल्या पळापळीमुळे १६२ जणांचा मृत्यू झाला होता.

Stampede Cases in India: हाथरस चेंगराचेंगरीनंतर जुन्या जखमा भळभळल्या; महाराष्ट्रातही 2005 मध्ये घडलं होतं भयंकर, देशभरातील घटनांमध्ये आतापर्यंत किती मृत्यू?
Hatras Stampede Viral Video: हाच तो व्हिडिओ, इथंच झाली चेंगराचेंगरी; हाथरस सत्संगात नेमकं काय आणि कसं घडलं?

३० सप्टेंबर २००८ : जोधपूरमधील मेहरानगडमध्येही चामुंडादेवी मंदिर परिसरात चेंगराचेगरी झाली होती. या घटनेत २२० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

४ मार्च २०१० : उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये झालेल्या रामजानकी मंदिराजवळ चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्देवी घटनेत ६३ जणांचा मृत्यू झाला होता. मोफत कपडे आणि भोजन घेण्यासाठी एकच गर्दी उसळल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती.

१४ जानेवारी २०११: केरळच्या शबरीमला मंदिराच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत १०४ जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभरपेक्षा अधिक जखमी झाले होते.

८ नोव्हेंबर २०११ : हरिद्वारमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २० जणांचा मृत्यू होता.

२५ सप्टेंबर २०१२ : झारखंडच्या अनुकूल चंद यांच्या जयंतीनिमित्त एका आश्रमाच्या परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत गुदमरून १२ जणांचा मृत्यू झाला होता.

१९ नोव्हेंबर २०१२ : पाटण्यातील अदालत घाटात छट पूजेच्या वेळी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता.

२०१३ : अलाहाबादमधील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन ३९ जणांचा मृत्यू झाला होता.

१३ ऑक्टोबर २०१३ : नवरात्रीच्या काळात मध्य प्रदेशातील दातिया येथील रत्नगड मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत किमान ११५ जणांचा मृत्यू झाला होता.

Stampede Cases in India: हाथरस चेंगराचेंगरीनंतर जुन्या जखमा भळभळल्या; महाराष्ट्रातही 2005 मध्ये घडलं होतं भयंकर, देशभरातील घटनांमध्ये आतापर्यंत किती मृत्यू?
Uttar Pradesh Hathras: हाथरसमधील भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ५० ते ६० जणांचा मृत्यू, मृतांमध्ये २५ महिलांचा समावेश

२५ ऑगस्ट २०१४ : मध्य प्रदेशातील कामतनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन दहा जणांचा मृत्यू झाला.

३ ऑक्टोबर २०१४ : पाटण्यातील दसरा उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी होऊन ३२ जणांचा मृत्यू झाला होता.

१४ जुलै २०१५ : आंध्र प्रदेशच्या गोदावरीच्या काठावर जमलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी झाली. यात २७ जणांचा मृत्यू झाला होता.

१ जानेवारी २०२२ : जम्मू काश्‍मीरमधील वैष्णोदेवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला होता.

३१ मार्च २०२३ : इंदोरमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान प्राचीन बावडीवरचा स्लॅब अचानक कोसळल्याने ३६ जणांचा मृत्यू झाला होता.

माहितीचा स्त्रोत - सकाळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com