Hathras Stampede: सोन्याचं घड्याळ, महागडे चष्मे अन् डिझायनर कपडे; भोले बाबांची रॉयल लाइफस्टाइल

Hathras Bhole Baba Royal Lifestyle: हाथसरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे नारायण साकर हरी म्हणजेच भोले बाबा चर्चेत आले आहेत. भोले बाबा हे सामान्य नाहीत तर ते खूपच रॉयल लाइफस्टाइल जगतात.
Hathras Stampede: सोन्याचं घड्याळ, महागडे चष्मे अन् डिझायनर कपडे; भोले बाबाची रॉयल लाइफस्टाइल
Bhole Baba Royal LifestyleSaam Tv

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथसरमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा (Bhole Baba) यांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये १२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हाथसरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे नारायण साकर हरी म्हणजेच भोले बाबा चर्चेत आले आहेत. भोले बाबा हे सामान्य नाहीत तर ते खूपच रॉयल लाइफस्टाइल जगतात. सोन्याचे घड्याळ, महागडे चष्मे, डिझायनर कपडे आणि शूज अशी लाइफस्टाइल ते जगतात. भोले बाबाबाबत एक एक गोष्ट समोर येत आहे. त्यामुळे भोला बाबाधर्माच्या नावाखाली धंदा चालवताच की काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. .

Hathras Stampede: सोन्याचं घड्याळ, महागडे चष्मे अन् डिझायनर कपडे; भोले बाबाची रॉयल लाइफस्टाइल
Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढला; रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंचाळ्या

भोले बाबांचा सत्संगचे जेव्हा आयोजन केले जाते तेंव्हा त्यांची खासगी सेवकांची फौज सत्संगाची सुरक्षा, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग, पाणी यांची व्यवस्था करतात. जिथे जिथे भोले बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तिथे महिला देखील सेवादारांसोबत काम करतात. भोले बाबांचे कासगंज येथे आश्रम आहे. बाबांचे आश्रम खूपच भव्य आहे. या आश्रमाचे सर्व दरवाजे बंद आहेत आणि प्रत्येक दरवाजावर पहारा आहे.

भोले बाबा उर्फ ​​नारायण साकार हरी जिथे जातील तिथे त्यांच्या ताफ्यासह प्रवास करतात. आधी दोन डझन दुचाकीस्वार बाबांच्या ताफ्यातून जातात, त्यानंतर महागड्या वाहनांचा ताफा येतो आणि नंतर ताफ्याच्या मागे आणखी वाहने असतात. त्यापैकी एका कारमध्ये भोले बाबा उपस्थित असतात.

Hathras Stampede: सोन्याचं घड्याळ, महागडे चष्मे अन् डिझायनर कपडे; भोले बाबाची रॉयल लाइफस्टाइल
Hathras stampede : हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार, आयोजकांवर गुन्हा

नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा यांची लाइफस्टाइल खूपच रॉयल आहे. त्याची लाइफस्टाइल एखाद्या मोठ्या श्रीमंतालाही लाजवेल अशी आहे. भोले बाबांकडे महागड्या कार आहेत. ऐवढंच नाही तर कपड्यांसाठी स्पेशल डिझायनरची टीम आहे. ते इतर धर्मगुरूंप्रमाणे अंगावर भगवे वस्त्र घालत नाही किंवा त्यांच्यासारखी लाइफस्टाइल जगत नाही. भोले बाबा अतिशय टिप टॉप स्टाईलमध्ये राहतात. भोले बाबांना पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला प्रचंड आवडते. त्यांना महागड्या चष्म्याची आवड आहे. त्याच्या हातात नेहमी सोन्याचे घड्याळ असते. बाबांचे कपडे आणि शूज खास डिझाइन केलेले असतात. तर बाबांनी कपड्यांसाठी वेगळा डिझायनर नेमला आहे.

Hathras Stampede: सोन्याचं घड्याळ, महागडे चष्मे अन् डिझायनर कपडे; भोले बाबाची रॉयल लाइफस्टाइल
UP Hathras Stampede : मृतांचा खच पाहून आला हृदय विकाराचा झटका, ऑन ड्युटी पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू

नारायण हरी उर्फ ​​भोले बाबा यांचे अनुयायी कोणत्या देवाची पूजा करतात याची अद्याप स्पष्टपणे माहिती समोर आली नाही. नमस्ते ऐवजी भोले बाबांचे समर्थक ‘परमपिता परमेश्वर की संपूर्ण ब्रहमांड में सदा सदा के लिए जयजयकार हो जयजयकार हो’ असे म्हणतात. टिप टॉप स्टाईलमध्ये राहणारे भोले बाबा उर्फ ​​नारायण साकार हरी हे हातरसमधील सत्संगमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

Hathras Stampede: सोन्याचं घड्याळ, महागडे चष्मे अन् डिझायनर कपडे; भोले बाबाची रॉयल लाइफस्टाइल
Hathras Stampede: भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी; कोण आहेत नारायण साकार हरी भोले बाबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com