Raigad : काशीद येथे राज्यातील बालरोग तज्ज्ञांचे तीन दिवस अधिवेशन सुरू राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad : काशीद येथे राज्यातील बालरोग तज्ज्ञांचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू

राज्यातील तज्ञ डॉक्टर सेमिनारच्या माध्यमातून एकत्र येऊन बालरोगांविषयी चर्चा करत आहेत. याचा लहान मुलांवरील आजारांवर उपचार करण्यासाठी निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज मुरुड काशीद येथे केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : राज्यातील तज्ञ डॉक्टर सेमिनारच्या माध्यमातून एकत्र येऊन बालरोगांविषयी चर्चा करत आहेत. याचा लहान मुलांवरील आजारांवर उपचार करण्यासाठी निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज मुरुड काशीद येथे केले. मुरुड तालुक्यातील काशीद येथील प्रकृती रेसॉर्ट येथे राज्यातील विविध तज्ञ डॉक्टरांचे तीन दिवसीय सेमिनार सुरू आहे, या सेमिनारच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.वाय.के.आमडेकर, डॉ.उदय बोधनकर, डॉ.राजू शहा, डॉ.नितीन शहा, डॉ.विजय येवले, डॉ.बकुळ पारेख, डॉ.जयंत उपाध्येय, डॉ. राजीव धामणकर, डॉ.दाभाडकर, डॉ.महेश मोहिते, आदिंसह इतर डॉक्टरही उपस्थित होते.

हे देखील पहा :

पालकमंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, हे सेमिनार राज्यातील लहान बालकांच्या विविध आजारांवर उपचार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणार असून याद्वारे लहान बालकांना होणाऱ्या विविध रोगांवर एकच उपचार पद्धती अंमलात आणता येईल. या माध्यमातून उपस्थित डॉक्टरांचा अनुभव व परीक्षण याद्वारे लहान मुलांना चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. करोनाच्या कोणत्याही लाटेशी सामना करण्याची आमची तयारी आहे. परंतु लहान मुलांना करोना झाल्यास अद्ययावत व तांत्रिक पद्धतीने त्या बालकांवर कसे उपचार करता येतील, यासाठी या सेमिनारसाठी उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी आपले अनुभव पणाला लावले आहेत.

या अनुभवी डॉक्टरांच्या ज्ञानाचा ग्रामीण भागातील डॉक्टरांनादेखील उपयोग व्हायला हवा. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुलांचेही आरोग्य सदृढ राहण्यास महत्वपूर्ण योगदान मिळेल. असेही पालकमंत्री यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्याचा हा गौरव आहे की, प्रशिक्षित व अनुभवी डॉक्टर यांचे तीन दिवसीय सेमिनार या जिल्ह्यात घेण्यात आले, लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हा एक चांगला उपक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे, असे बोलून त्यांनी बालकांचे कुपोषण कसे दूर करता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या सेमिनारच्या माध्यमातून कुपोषणासारख्या समस्येवर दीर्घकालीन उपाय सुचविल्यास संपूर्ण राज्याला याचा उपयोग होईल, अशी आशा पालकमंत्री यांनी व्यक्त केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT