फुले दाम्पत्याने भिडे वाड्यात सुरु केलेली पहिली शाळा पुन्हा सुरु होणार!

या जागेचा वाद न्यायालयात गेल्याने गेली अनेक वर्ष ही शाळा बंद असून इमारतही भग्नावस्थेत आहे. मात्र हा वाद मिटवून याबाबतीत न्यायालयीन प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
फुले दाम्पत्याने भिडे वाड्यात सुरु केलेली पहिली शाळा पुन्हा सुरु होणार!
फुले दाम्पत्याने भिडे वाड्यात सुरु केलेली पहिली शाळा पुन्हा सुरु होणार!SaamTvNews
Published On

पुणे : पुण्यातील (Pune) ज्या भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्याच भिडे वाड्यातील ही शाळा पुन्हा सुरु होण्याची शक्यता निर्माण झालीय. या जागेचा वाद न्यायालयात (Court) गेल्याने गेली अनेक वर्ष ही शाळा बंद असून इमारतही भग्नावस्थेत आहे. मात्र, हा वाद मिटवून याबाबतीत न्यायालयीन प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याबाबतची माहिती आज माध्यमांना दिली. भिडे वाड्यामधे स्मारक उभारण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भुजबळ यांच्यात चर्चा झाली.

हे देखील पहा :

या वाड्याच्या खालच्या मजल्यावर सध्या दुकाने आहेत. सध्या ही जागा एका बँकेच्या ताब्यात आहे. बँक आणि मुळ मालक यांच्यामधे याबाबत न्यायालयात वाद सुरु आहे. बँकेचे अधिकारी आणि मुळ मालक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल आणि न्यायालयातील वाद संपेल अशी अपेक्षा आहे. भिडे वाड्यात पुन्हा मुलींची शाळा सुरु करण्यात येईल. ही शाळा महापालिकेकडून चालवली जाईल. जवळपास आठ हजार स्क्वेअर फूट जागा शाळेसाठी उपलब्ध होईल. याच जागेवर मुलींची शाळा सुरु करणे हीच सावित्रीबाईना खरी श्रद्धांजली ठरेल, असं भुजबळ यांनी म्हटलंय.

फुले दाम्पत्याने भिडे वाड्यात सुरु केलेली पहिली शाळा पुन्हा सुरु होणार!
Breaking : आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल! पाहा Video

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) कुलगुरु, पदाधिकारी, विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक हरी नरके (Hari Narake) उपस्थितीत होते. या बैठकीत निर्णय झाला की तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाईंचा पुत॓ळा बसवण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com