rahul gandhi and narendra modi  saam tv
महाराष्ट्र

Rahul Gandhi: 'नियत नीट नव्हती म्हणूनच पुतळा कोसळला..', राहुल गांधी कडाडले; मालवण दुर्घटनेवरुन PM मोदींवर टीका

Rahul Gandhi Speech On Chhatrapati Shivaji Maharaj Kolhapur: देश सर्वांचा आहे, सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असा विचार त्यांनी दिला. भारताचे संविधान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. मात्र आज छत्रपती शिवरायांचा विचार दिसत नाही, ' असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

सुनिल काळे, प्रतिनिधी

Rahul Gandhi Speech Kolhapur: राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरन झाले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश दिला, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाले राहुल गांधी?

"हा कार्यक्रम काल होणार होता, मात्र विमानात बिघाड झाल्यानं येऊ शकलो नाही. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. ज्यांची मूर्ती बनते त्यांच्या विचाराचं आपण समर्थन करतो. महाराज सर्वांना बरोबर घेऊन जात होते. देश सर्वांचा आहे हे त्यांचे विचार होते. २१ व्या शतकात तेच विचार संविधानात आहे. देशामध्ये एक विचारधारा संविधान वाचायचा प्रयत्न करतेय. दुसरी विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या संविधानाला धोक्यात आणतेय," असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

PM मोदींवर टीका..

"छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला सर्वात मोलाचा संदेश दिला. देश सर्वांचा आहे, सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असा विचार त्यांनी दिला. भारताचे संविधान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. मात्र आज छत्रपती शिवरायांचा विचार दिसत नाही," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

"महाराजांचा राज्याभिषेक होत असताना याच विचारधारेनं त्यांच्या राज्याभिषेधकाला विरोध केला होता. त्याविरोधात महाराज लढत होते. त्यांची नियत नीट नव्हती म्हणून त्यांच्या हातातून अनावरण झालेला पुतळा कोसळला. त्यांनी राम मंदिर, संसदेत ‌आदिवासी राष्ट्रपतींना उद्घाटनाला बोलावलं नाही. हीच यांची विचारधारा आहे. महाराष्ट्रात महाराजांची विचारधारा आहे, संविधान वाचवा म्हणजेच महाराजांचे विचार वाचवा.." असे आवाहनही यावेळी राहुल गांधींनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT