Maharashtra Elections : कोल्हापुरातून काँग्रेसचं रणशिंग, 14 वर्षांनंतर राहुल गांधी करवीरनगरीत येणार

Rahul gandhi kolhapur visit : राहुल गांधी तब्बल 14 वर्षानंतर कोल्हापूरात येणार आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे.
Rahul gandhi
Rahul gandhiSaam tv
Published On

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही कोल्हापूर

Maharashtra Politics : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येतायत. काँग्रेसनं नेहमीच महाराष्ट्रातील निवडणुकांच्या (maharashtra assembly election 2024) प्रचाराचा नारळ नंदुरबारमधून फोडलाय. यंदा कोल्हापुरात राहुल गांधी येत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीये. कारण काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रावर (2024 Maharashtra Legislative Assembly election) विशेष लक्ष केंद्रित केलंय. मात्र राहुल गांधींच्या विरोधात भाजपनंही कंबर कसलीये.. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय.

राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबरला कोल्हापूरात येत आहेत. तब्बल 14 वर्षानंतर राहुल गांधी कोल्हापूरात येणार आहेत. अवघ्या महिनाभरात राहुल गांधींचा दुसरा महाराष्ट्र दौरा असेल. राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी 2010 साली म्हणजेच तब्बल 14 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात काही कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यानंतर थेट आता राहुल गांधी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने भाजप आक्रमक झालीये. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी परदेशातून आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं होतं. या विरोधात भाजप निदर्शने करणार आहे.

Rahul gandhi
Maharashtra Assembly Election : ठाकरे गटाचं विधानसभेचं जागावाटप ठरलं? शिवसेनेच्या बैठकीत आकडा झाला निश्चित; वाचा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.. गेल्या महिन्यात राहुल गांधी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोदींसह भाजपवर कडाडून टीका केली होती. दरम्यान नेहमीच नंदुरबारमधून प्रचाराचा नारळ फोडणारी काँग्रेस यंदा साखरपट्ट्यात तेही कोल्हापुरात येऊन मतपेरणी करताना दिसणार आहेत. राहुल गांधींचा पश्चिम महाराष्ट्र दौरा काँग्रेसला उर्जित अवस्था देणार का ? आणि साखरपट्टयातील ही मतपेरणी काँग्रेससाठी गोड ठरणार का हे विधानसभेच्या निवडणुकीतच समजेल.

Rahul gandhi
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट; या तारखेला एकाच टप्प्यात होणार मतदान? आचारसंहिता कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com