अहिल्यानगर येथील सहकारी सोसायटी सचिवांच्या अधिवेशनात मंत्री विखे पाटील यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
कृषीमंत्री असताना शरद पवारांनी सहकारासाठी काय केले? असा सवाल विखे पाटील यांनी केला.
अमित शहांनी सहकारी सोसायट्यांना दीडशेहून अधिक व्यवसायासाठी परवानगी दिली, असा विखे पाटील म्हणाले.
सचिन बनसोडे, साम टीव्ही
Maharashtra Politics : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री असताना देखील त्यांनी सहकारासाठी काय योगदान दिले? असा सवाल उपस्थित करत विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ते अकोले येथे बोलत होते.
राज्यभरातील सहकारी सोसायटींच्या सचिवांचे अधिवेशन अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे पार पडलं. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार किरण लहामटे उपस्थित होते. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून सचिवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली.
'मला एक तरी उदाहरण दाखवा, त्यांनी सहकारी सोसायटीसाठी भरीव काम केलं आहे. केंद्रामध्ये सुद्धा ते मंत्री होते, त्यांच्याकडे सहकार खातं होतं. पूर्वी कृषी मंत्रालयाकडे सहकार खातं असायचं. मग दहा वर्ष कृषीमंत्री असताना सहकारासाठी त्यांनी काय योगदान दिलं? असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला.
'अमित शहांच्या माध्यमातून आज सहकारी सोसायटी यांना नवसंजीवनी दिली जात आहे. दीडशे हून अधिक व्यवसाय करण्याची परवानगी सोसायटी यांना दिली. सरकार सरकारचं काम करेल. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत सहकारी सोसायटींनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
सहकार राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, 'मी आज या भागात आलो. या भागातली हिरवळ बघितल्यावर खूप बरं वाटलं. या भागातील हिरवळ सहकाराच्या माध्यमातून तयार झालेली आहे. मात्र आमच्या विदर्भात अशी हिरवळ दिसणार नाही. तुमचा मंत्र आहे, सहकारातून समृद्धी तर आमच्याकडे सहकारातून स्वहकार हा मंत्र अनेक वर्ष करण्यात आला. त्यामुळेच आमच्या विदर्भातलं सहकार पूर्णपणे संपलं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.