pwd removed encroachment from aasalgaon bus stand to palshi supo road buldhana  Saam Digital
महाराष्ट्र

Buldhana: आसलगाव- आडोळ फाटा जिल्हा महामार्ग कामातील अडथळा दूर, तगड्या पाेलिस बंदाेबस्तात अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

संजय जाधव

सार्वजनिक बांधकाम विभागाने आज (शनिवार) आसलगाव बस स्टँड ते पळशी सुपो रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात सुरुवात केली आहे. हे अतिक्रमण काढताना विराेध हाेण्याची शक्यता गृहित धरुन पाेलिसांनी परिसरात तगडा बंदाेबस्त ठेवला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ते आडोळ फाटा या जिल्हा महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा महामार्ग हा 18 मीटर रुंद असल्याने आसलगाव परिसरात अनेक ठिकाणी झालेली अतिक्रमणे काढणे गरजेचे बनले हाेते. त्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात होणे कठीण होते.

या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने चोख पोलीस बंदोबस्तात महसूल विभागाच्या सहकार्याने शाखा अभियंता निलेश भिलके यांच्या उपस्थितीत आज अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

येत्या दोन दिवसात आसलगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सुलज, पळशी सुपो, मोहीदेपुर या गावातील मुख्य रस्त्यावरील 18 मीटरच्या आतील अतिक्रमणे नागरिकांनी त्वरित काढून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता निलेश भेलके यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT