Nagar : सुपा बसस्थानक ते पारनेर रस्त्याने घेतला माेकळा श्वास, शेकडाे अतिक्रमणे जमीनदाेस्त

यामुळे गावामध्ये एक तणावपूर्ण शांतता आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही कारवाई झाल्याने याबाबत ही कारवाई सूडबुद्धीने झाल्याची चर्चा सध्या सुपा गावात आहे.
pwd removed encroachment from supa
pwd removed encroachment from supaSaam Digital

- सुशील थोरात

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथे आज (शनिवार) सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंत शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

सुपा पारनेर रोडवरील अनेक पक्की आणि पत्र्याची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत. प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत.

pwd removed encroachment from supa
Amravati Hit And Run Case: पुण्यानंतर अमरावतीतही हिट अँड रन, घटना सीसीटीव्हीत कैद; युवक पाेलिसांना का सापडेनात? नातेवाईकांचा सवाल

सुपा बस स्थानकापासून ते पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या आधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या.

रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावे यासाठी अतिक्रमण रेषा ही आखून दिली होती. तरीही अतिक्रमण काढले गेले नसल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने मोहीम राबवली गेल्याची माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

pwd removed encroachment from supa
Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com