(मनोज जयस्वाल)
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इंटरचेंज जवळील समृद्धी महामार्गाच्या विश्राम भवन येथे आढावा बैठक घेतली. या रस्त्यासंदर्भात अपघात दरम्यान मिळणाऱ्या सुविधा व प्रवाशांना मिळणाऱ्या सोयीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.(Latest News)
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातानंतर लुटीचा प्रकार झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु आमच्या माहितीप्रमाणे अद्याप असा कुठलाही प्रकार झाला नाही. तसेच अपघात झाल्यानंतर १० मिनिटांच्या आत प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिली जाते, असे दादा भुसे बोलत होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान या ऑक्टोबर महिन्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या महामार्गावर १२८१ अपघात झालेत. त्यात १२३ जणांचा मृत्यू झालाय. वाहतूक नियमांचे पालन न करता वाहनचालक बेभान होऊन वाहन चालवतात. या कारणांमुळे महामार्गावर अपघात होत आहेत. ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार, नागपूर ते मुंबईपर्यंत एकूण १२८१ अपघात झालेत. त्यातील किरकोळ अपघातांची संख्या ९३२ आहे. तर मोठ्या अपघातांची संख्या ४१७ इतकी आहे.
ज्याप्रकारे देश पातळीवर नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान यांचा चेहरा समोर ठेवून आपण जानतेच्या दरबारात जातो. त्याचप्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जण येत्या निवडणुकीला सामोरे जाऊ.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.