Assembly Winter Session 2023: यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजणार? विरोधी पक्षांनी दिले संकेत

Vijay Wadettiwar : यंदाचं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यावरून गाजणार आहे, असे संकेत विरोधी पक्षाने आतापासूनच देण्यास सुरुवात केली आहे. 7 डिसेंबरपासून राज्याची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
Maharashtra Assembly Winter Session 2023
Maharashtra Assembly Winter Session 2023Saam Tv
Published On

Maharashtra Assembly Winter Session 2023 :

यंदाचं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यावरून गाजणार आहे, असे संकेत विरोधी पक्षाने आतापासूनच देण्यास सुरुवात केली आहे. उद्यापासून म्हणजेच 7 डिसेंबरपासून (शुक्रवार) राज्याची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमाचा विरोधी पक्षांनी बहिष्कार करत अधिवेशन गाजणार असल्याचे संकेत दिले.

आज नागपूर येथील रविभवन येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत. हा कार्यक्रम टाळला असता तर शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने सरकारने शेतकऱ्याप्रती ही संवेदनशीलता दाखवली नाही. पण संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्ही चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमीका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Assembly Winter Session 2023
Beed Politics : उद्धव ठाकरे गटाला बीडमध्ये मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली पक्षाची साथ

यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ''राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील वाढता रोष, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिद्धीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम करत आहे. यावरून सरकारचा संवेदनशिलपणा हरविल्याचे दिसून येते.'' (Latest Marathi News)

वडेट्टीवार म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी ओळख या महायुती सरकारने केली. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली झाल्या. महाराष्ट्रात २०२२ मध्ये दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही त्या वर्षातल्या देशातील सर्वाधिक नोंद असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहिती आहे.''

Maharashtra Assembly Winter Session 2023
ED Raid in Mumbai : दादरचे प्रसिद्ध साडीचे दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीची धाड; इतर ५-६ ठिकाणी झाडाझडती

महायुती सरकार आल्यावर राज्यात दंगली, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली. संत्रा नगरी असलेल्या नागपूरची ओळख आता चोरांची राजधानी अशी झाली आहे. जर महाराष्ट्राची ही ओळख होत असेल तर या राज्यात गुंतवणूक कशी येणार? उद्योग कसे येणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

'चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारी तिजोरी लुटून खाऊ'

वडेट्टीवार पुढे म्हणाले, राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन तेरा वाजले आहेत. एकंदरीतच फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम आपल्या सरकार मार्फत केले जात आहे. चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com