Pune Nashik Highway Saam Tv News
महाराष्ट्र

पुणे - नाशिक प्रवास होणार जलद; २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर, कुठून कसा असणार एलिव्हेटेड मार्ग?

Pune–Nashik Highway: नाशिक फाटा–राजगुरुनगर महामार्गावर २८ कि.मी. उन्नत मार्गिका उभारली जाणार. प्रवासाचा वेळ २ तासांवरून थेट २० मिनिटांवर येणार. चाकण व परिसरातील गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू.

Bhagyashree Kamble

  • नाशिक फाटा–राजगुरुनगर महामार्गावर २८ कि.मी. उन्नत मार्गिका उभारली जाणार.

  • प्रवासाचा वेळ २ तासांवरून थेट २० मिनिटांवर येणार.

  • चाकण व परिसरातील गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू.

  • पुणे महानगर वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रिंग रोड आणि बाह्य वळण रस्ते नियोजित.

पुणे ते नाशिकरांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि जलद होणार आहे. नाशिक फाटा ते राजगुरूनगर हा २८ कि.मी लांबीचा पुणे नाशिक महामार्गावरील उन्नत मार्गिकेच्या कामाला गती मिळणार आहे. ही मार्गिका तयार झाल्यानंतर प्रवासासाठी सध्या लागणारा दीड ते दोन तासांचा कालावधी अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे. यामुळे नाशिक आणि पुणेकरांचा प्रवास जलद होणार आहे. कुठून कसा असणार मार्ग? पाहा.

या प्रकल्पासाठी खेड तालुक्यातील नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरूळी आणि चाकण या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करण्यात येणार आहे. तसेच चाकण शहरातील वाहतूक कमी करण्यासाठी मेदनकरवाडी, कडाची वाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बाह्य वळण रस्ते उभारण्याचे नियोजन आहे.

पुणे महानगरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते रूंदीकरण आणि नवे रस्ते उभारणीसाठी तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे आदेश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत. यात मुळशी तालुक्यातील बालेवाडी ते शेडगेवस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे माण आदी मार्गांचा समावेश आहे.

तसेच नवले पूल भागात वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. वर्तुळाकर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरूये. यासंबंधित मोजणी करून प्रस्ताव भूसंपादन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे.

वर्तुळाकार रस्त्याचे टप्प्याटप्प्यानं काम

रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात नाशिक महामार्ग ते अहिल्यानगर रस्ता या मार्गावरील सोलू,सोलू इंटरचेंज, वडगाव शिंदे आणि निरगुडी गावांतील मोजणी पूर्ण झाली असून, भूसंपादन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यात अहिल्यानगर महामार्ग ते सोलापूर महामार्गावरील आंबेगाव खूर्द आणि भिलारेवाडीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे.

तिसऱ्या टप्प्यात सोलापूर ते सातारा रस्ता आणि चौथ्या टप्प्यात सातारा ते पौड रस्ता या मार्गावरील प्रक्रियेवर चर्चा झाली आहे.

पुणे पीएमआरडीएच्या औंध कार्यालयात विविध प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा आदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास आणि नियोजन संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढर आदी अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

SCROLL FOR NEXT