Tourist Drowned Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg Tourist Drowned: पुण्यातील ६ पर्यटक देवगड समुद्रात बुडाले, ४ जणांचा मृत्यू

Sankalp Sainik Academy : पुणे येथील संकल्प सैनिक अॅकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. यातील काहीजण समुद्रात आनंद लुटण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.

Bharat Jadhav

(विनायक वंजारे)

Pune Sankalp Sainik Academy Tourist Drowned in Sindhudurg:

सिंधुदुर्गातील देवगड येथे सहलीला आलेल्या पुण्यातील सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून एकजण असून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे येथील संकल्प सैनिक अ‍ॅकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. यातील काहीजण समुद्रात आनंद लुटण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.(Latest News)

बुडालेल्यांपैकी चार जणांचे मृत सापडले आहेत. प्रेरणा डोंगरे,अंकिता गालटे,अनिषा पडवळ,पायल बनसोडे अशी मृतांची नावे आहेत. याच्याबरोबर अजून दोनजण बुडाले आहेत, त्यातील आकाश तुपे नावाच्या पर्यटकाला वाचवण्यात आलंय. तर राम डिचवलकर हे अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे पिंपरी चिंचवड येथील संकल्प सैनिक अ‍ॅकॅडमीची सहल देवगड येथे गेली होती. या ट्रीपमध्ये साधारण ३५ जण विद्यार्थी होते. यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. समुद्रातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने विद्यार्थी पाण्यात बुडाले. विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी, तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले होते.

यातील ५ ते ६ जणांना पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या ५ ते ६ जणांना देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेल्यांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून एकजण अजून बेपत्ता आहे. राम डीचोलकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पोलीस आणि बचाव पथक त्याचा शोध घेत आहेत. या सहा मुलाचे वय १८ ते २४ वर्ष वयोगटातील असल्याची माहिती देवगड तहसीलदारांकडून देण्यात आलीय.

या माहितीनुसार, आज ९-१२-२०२३ रोजी संकल्प सैनिक अकादमी, पुणे येथील ३६ मुले पर्यटनासाठी देवगड येथे आली होती. यातील काही जण देवगड पवनचक्की चे खालील गार्डन चे बाजूला असलेल्या समुद्रात पोहोण्यासाठी उतरले. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी पाण्यात बुडू लागली, यातील ५ जणांना वाचवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT