Zilla Parishad School Students : सहलीत चिकन खाल्ल्यानंतर 52 विद्यार्थ्यांना विषबाधा, 12 जण रुग्णालयात दाखल

या घटनेचा तपास पाेलिस आणि शिक्षण विभागाने सुरू केला आहे.
Chandrapur, hospital, zilla parishad school, chicken
Chandrapur, hospital, zilla parishad school, chickenSaam Tv
Published On

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या (zilla parishad school) विद्यार्थ्यांची सहलीत (picnic) हा प्रकार घडला आहे. बारा विद्यार्थ्यांना (students) रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Chandrapur, hospital, zilla parishad school, chicken
Soyabean Market Price : स्थिरावलेला सोयाबीनचा दर उचल खाणार, शेतक-यांना अपेक्षा

विद्यार्थ्यांची सहल संपल्यानंतर त्यांना एका ठिकाणी चिकनचे (chicken) जेवण देण्यात आले होते. सर्वांचे जेवण झाल्यानंतर काही वेळाताच विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. सुमारे बावन्न विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यापैकी बारा जणांची प्रकृती ढासळली.

Chandrapur, hospital, zilla parishad school, chicken
Sangli News : अमर रहे... अमर रहे... नायब सुभेदार जयसिंग भगत अमर रहे... खानापूरात शाेककळा

या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. आता धाेका टळला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच पाेलिस (police) विभागाचे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत पाेहचले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com