Pune Regional Psychiatric Hospital Corruption Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Crime : ठेकेदाराकडून अशिक्षित महिलांच्या बोगस सह्या, प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा घोटाळा; पुण्यात खळबळ

Pune Regional Psychiatric Hospital Contractor Corruption : चक्क ठेकेदारानेच सफाई कर्मचाऱ्यांच्या बोगस सह्या करून त्यांच्या नावे ॲडव्हान्स घेऊन रुग्णालयाची फसवणूक केली.

Prashant Patil

सुनील पाटील

पुणे : प्रादेशिक मनोरुग्णालयातील भ्रष्टाचार थांबता थांबत नाही. आता तर कामगारांची फसवणूक मनोरुग्णालयात झाली. मनोरुग्णालयातील अधीक्षक संजय पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं उघड झालं. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या मालिकेला सुरुवात झाली. चक्क ठेकेदारानेच सफाई कर्मचाऱ्यांच्या बोगस सह्या करून त्यांच्या नावे ॲडव्हान्स घेऊन रुग्णालयाची फसवणूक केली. प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथील कामगारांची झालेली लूट चौकशी अहवाल मार्फत उघड झाली.

गेले कित्येक वर्ष ५० ते ६० सफाई कंत्राटी कामगार काम करत आहेत. परंतु त्यांना ठेकेदार ८ तास काम केल्यास ८००० रुपये १२ तास काम केल्यास ११००० रुपये आणि १६ तास काम केल्यास १६००० रुपये असे पगार देत असून सर्व कामगारांनी ठेकेदारची तक्रार जनहित कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य सचिव जी संजय कोने यांच्याकडे केली. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून २४ ऑगस्टपासून प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा व उपसंचालक कार्यालय यांना वारंवार पत्र व्यवहार केला. या पत्रव्यवहारात ठेकेदार रुग्णालयातील पूर्वीचे अधीक्षक यांचा हात असल्याचा समोर आला.

ठेकेदाराकडून कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियम १९४८ कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) व प्रोव्हेडन फंड (PF) कपात करत असून त्यांची माहिती कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. नॅशनल सुट्टीदिवशी काम करून त्यांचा पगार दिला जात नाही. वार्षिक सुट्ट्यांचा पगार (लिव्ह पेमेंट) आणि कामगार कायद्याप्रमाणे ८.३३% दिवाळी बोनस दिला जात नाही. असा कुठलाही कामगार कायदा ठेकेदार पाळत नाही. तसेच ह्या सर्व गोष्टी ठेकेदार व आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यात झालेल्या करारात असून ठेकेदाराने त्या सर्व बाबींची पूर्तता करणे बंधनकारक होते. तरीही त्याच्यावर आरोग्य विभागाचा कुठलाही वचक नाही व तसे उपसंचालक राधाकृष्ण पवार यांचेही आदेश नाहीत. तरीही गेले सात वर्षे संबंधित ठेकेदाराला आरोग्य विभागातून प्रत्येक महिन्याचे बिल अदा केले गेले.

अशा प्रकारे गरीब सफाई कामगारांची लूट ठेकेदार गेल्या सात वर्षापासून करत असून अधिकारी वारंवार संबंधित बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यासंदर्भात जनहित कामगार संघटना, महाराष्ट्र राज्यतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. १५ दिवस ते आंदोलन चालले परंतू उपसंचालक राधाकृष्ण पवारांनी ठेकेदाराला वाचवण्यासाठी बाहेरील रुग्णालयातून अतिरिक्त सफाई कामगार पाठवले, परंतु आंदोलनावर तोडगा काढला नाही.

ठेकेदाराच्या अटी काय? आणि सफाई कर्मचाऱ्यांना दिलेली वागणूक

1) रोख पैसे अदा न करता बँक ट्रान्सफर करावे

2) ठेकेदाराने एकाही कामगाराला बँकेतून पैसे दिले नाहीत

3) ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना इंग्रजी येत नाही अशा महिला कर्मचाऱ्यांच्या इंग्लिश मध्ये सह्या घेतल्या

४) अनेक महिला कामगारांना लिहिता वाचता येत नाही अशाही महिला कामगारांच्या सह्या

५) सह्या करून महिला कामगारांना ऍडव्हान्स दिला नाही

६) मला वाटतं ठेकेदाराने कोट्यावधी रुपये काढले

७) अँडव्हान्स म्हणून देऊन कामगारांच्या खोट्या स्वाक्षरी करून तसे कागदपत्रे आरोग्य विभागाकडे देण्यात आले व आरोग्य विभागाचीही फसवणूक करण्यात आली

८) तर ठेकेदाराच्या काही महिला सुपरवायझर कडून या महिलांना मारहाणी करण्यात आली. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे.

संजय पाटील यांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला हा ठेका दिला होता. मात्र, गेले अनेक वर्ष कामगारांच्या नावाखाली लूट करणाऱ्या या ठेकेदारावर नवीन अधीक्षक श्रीनिवास कोलाड यांनी बंधन घातले आहेत. जोपर्यंत कामगारांचा पीएफ त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत. तोपर्यंत ठेकेदाराला पैसे अदा करणार नाही असे त्यांनी सांगितलं, असं सफाई कामगार महिला आणि सचिव संजय कोणे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT