Datta Gade's Mobile Under Investigation Saam Tv News
महाराष्ट्र

Datta Gade : दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास सुरु, कुणाकुणाला फोन अन् कुणाला पैसे पाठवल्याची चौकशी करणार

Datta Gade Pune crime case investigation: स्वारगेट बस डेपोतील घटना घडल्यानंतर आरोपी दत्ता गाडेनी आपला फोन हा एका शेतात लपवला आहे अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

Omkar Sonawane

पुणे: स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून त्याच्या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या.

दत्ता गाडेची चौकशी करत असताना अनेक गोष्टींचा उलगडा त्याने त्याच्या तोंडून केला आहे. आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास सुरू आहे. नराधम गाडे हा एका शेतात जाऊन लपला होता. त्यावेळेस त्याने घटना घडल्यानंतर आपला मोबाईल हा शिरूरच्या एका शेतात फेकल्याची कबुली दिली आहे.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोमध्ये आलेल्या असताना एका तरुणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या मुळगावी गुनाट येथून ताब्यात घेतले. त्यांनंतर चौकशी दरम्यान आरोपी दत्ता गाडेनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

ही घटना घडल्यानंतर दत्ता गाडेनी आपला मोबाईल हा शेतात लपवला आहे असे पोलीस तपासातून समोर आलं आहे.आता या मोबाईलचा शोध पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. घटना घडल्यानंतर दत्ता गाडेनी घटना घडल्यावर मोबाईलवरून कोणा कोणाला फोन केले? याचा तपास केला जाणार आहे तसेच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाइन ऍप्लिकेशनवरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का? याचा सुद्धा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. मोबाईल सापडल्यावर त्याच्यातून कोण कोणत्या गोष्टी समोर येतात? हे बघणं तितकच महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT